माझी शाळा निबंध
माझी शाळा मला खूप आवडते. मला परिपूर्ण घडवून मला शिक्षण दिले, संस्कार दिले, ती माझी शाळा.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो ते घेतो तो गुरगुरुल्याशिवाय राहत नाही घर हे संस्काराचे प्रथम ठिकाण आहे व त्यानंतरचे महत्वाचे ठिकाण म्हणजे शाळा जी आपल्याला आयुष्य जगायला मार्ग दाखवते. व जीवन सुखी समाधानी जगण्यासाठी उत्तम मार्ग दाखवण्याचे काम शाळा करते. माझ्या शाळेतील वर्ग मित्र एकमेकांना खूप मदत करायचे. व त्यांची आठवण कायम स्मरणात राहते.
माझी शाळा माझ्या आठवणीचा खजिना आहे. बालपणीचा काळ सुखाचा, खेळ मौजमजा, गमतीजमती आम्ही माझ्या शाळेत केल्या. अशी ही माझी शाळा मला मनापासून आवडते. माझ्या शाळेतील शिक्षक खूप चांगले शिकवत असायचे समजावून सांगायचे. अवघड अभ्यास सोपा समजेल अशा भाषेत शिकवायचे. सहलीमध्ये आम्हाला पालकांप्रमाणे जपायचे आमची काळजी घायचे. परीक्षा आल्यावर अभ्यास करण्यासाठी आम्हांला सतत प्रोत्साहन दिले जायचे. माझी शाळा मला कायम चांगले वागण्याचा, चांगले जगण्याचा विचार करायले शिकवते ती माझी शाळा मला मार्गदाता वाटते.
माझी शाळा, माझे वर्गमित्र मला कायम आठवतात. मी कोठेही गेलो तरी मला माझ्या शाळेने मला जे चांगले शिकवले ते संस्कार आठवतात. आई वडील जेव्हा शाळेत नाव दाखल करतात तो शाळेतील पहिला दिवस कायम आठवणीत असतो. शाळेत आलेले अनुभव आपण कधीच विसरत नाही. ही माझी शाळा असे आपण कायम सांगत असतो. कारण आठवणीचा बालपणीचा काळ हा माणसाला पुढचे जीवन जगायला शिकवत असतो
आपण जेव्हा दुसऱ्या शाळेत जातो तेव्हा आपली शाळा आठवते. माझी शाळा या शाळेपेक्षा कशी होती. त्यावेळेस आपण आपल्या शाळेत असणाऱ्या सुविधा, खेळाचे मैदान, शिक्षक, शिपाईकाका कसे काम करायचे याचा विचार करतो. माझी शाळा मला कशी सुधारता येईल असा विचार मनात येतो. सद्याचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. या डिजिटल युगात माझी शाळा पण टीकायला हवी सर्व सुविधा असायला पाहिजेत असा आपण विचार करतो.
सध्या ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही गोष्टी मला माझ्या शाळेत चांगल्या पाहिजेत. वाचायला नवनवीन पुस्तके माझ्या शाळेत आहेत. संगणक तास जेव्हा असतो तेव्हा मला खूप नवीन शिकायला मिळते. अशी ही माझी शाळा सर्व समृद्ध अशी आहे. जी शाळा काळाबरोबर चालते व नवीन पद्धतीचा स्वीकार करून बदल घडवून आणते ती माझी शाळा मला खूप आवडते व माझ्या कायम आठवणीत असते.
माझी शाळा गरीब, श्रीमंत असा भेदभाव करत नाही. सर्व समान आहेत सगळ्यांना शिकण्याची ताकद देते, ऊर्जा देते. आपण कितीही मोठे झालो तरी ते सर्व मला शाळेतून मिळालेले संस्कार असतात. एकमेकांशी कसे वागावे, देशाचा अभिमान असावा हे शाळा शिकवते त्यासाठी माझ्या शाळेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, समाजसुधारकांच्या जयंत्या शाळेत साजऱ्या करतात व शाळा हे समाज घडवण्याचे काम करते म्हणून मला माझी शाळा खूप आवडते.
मागील वर्षी कोरोना रोग आला आणि दररोज नवसंजीवनी देणारी माझी शाळा दीड वर्षासाठी ऑफलाईन ची ऑनलाईन झाली. माझ्या शाळेच्या वर्ग खोल्या मुलांसाठी बंद झाल्या. ऑनलाईन मोबाईल वर शाळेचे तास सुरु झाले व वर्गात मिळणारे चैतन्य हरपून गेले, मित्रांचा सहवास दुरावला गेला. कधी एकदाची शाळा सुरु होते असे वाटायला लागले. मैदानी खेळ, व्यायाम बंद झाले. आणि सतत मोबाईल स्क्रीन कडे पाहून चष्मा कधी लागला ते कळाले नाही
आता 2022 वर्षी माझी शाळा सुरु झाल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. वर्गखोल्या परत सजू लागल्या. प्रत्यक्ष शाळेत बसण्याची मजा काही वेगळीच असते. एकमेकांशी भेटल्यावर गप्पा मारल्यावर असे वाटू लागले की काही झाले तरी शाळा कधीच बंद होऊ नये. माझी शाळा अशीच सतत चालू रहावी कोणत्याही कारणामुळे ती बंद पडू नये. अशी आहे माझी शाळा माझा सतत जगण्याची प्रेरणा देणारी हसायला, खेळायला लावणारी माझी शाळा मी कधीच विसरू शकणार नाही.
0 टिप्पण्या